अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या भव्य पुतळयाचे लोकार्पण केले होते. जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी लोकांची इथे रांग लागली आहे. लोकांनी रेकॉर्डब्रेक हजेरी लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी २८ हजार लोकांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एक नोव्हेंबर पासून सर्वसामान्य लोकांसाठी हा पुतळा खुला करण्यात आला. दररोज येथे हजारो लोक हजेरी लावत आहेत.


गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. पण महत्त्वाचं म्हणजे हा पुतळा एका मराठी माणसाने बनवला आहे. पद्मभूषण मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा डिझाईन केला आहे. त्यांच्या देखरेखेखालीच हा पुतळा चीनमध्ये बनवण्यात आला.