Himachal Pradesh Election officer in Tashigang : निवडणूकीत मतदान करणं अनेकांच्या जीवावर येतं. शासकीय सुट्टीची मज्जा घेत अनेकजण फिरायला जातात. मात्र, आजही अनेकांना मतदानाचा हक्क (Voting) बजावण्यासाठी धडपड करावी लागते. अशातच आता एक अशी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे तुमच्याही भूवया उंचावल्याशिवाय राहणार नाही, हिमाचल प्रदेशमधील जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर (the worlds highest polling booth) म्हणजे ताशिगांग (Tashigang) गावात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ताशिगांगमधील सर्व 52 नोंदणीकृत मतदारांनी शनिवारी जगातील सर्वोच्च मतदान केंद्रावर मतदान केलं. 15,256 फूट उंचीवर हे मतदान केंद्र आहे. ताशीगांग मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोपं जावं यासाठी अधिकाऱ्यांनी वरपर्यंत पायपीट केली आणि एक आदर्श मतदान केंद्र (Model Polling station in Tashigang) तयार केलं.


लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न अखेरीस सार्थकी लागले आणि ताशिगांगला 100 टक्के विक्रमी मतदान नोंदविण्यात मदत झाली (100 Percent Voting in Tashigang). येथे 7 वाजता मतदान सुरु झालं तेव्हा तापमान 0 अंशांच्या खाली होतं. पण मतदारांनी इतक्या थंडीतही आपल्या पांरपरिक वेशभुषेत मतदान केलं. 


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी एवढ्या उंचीवर (Lahaul and Spiti) पोहोचण्यासाठी तब्बल 6 तासाचा रस्ता पार केला. मतदान करण्यास आलेल्या लोकांना त्यावेळी मिठाई देखील देण्यात आली. तसेच पारंपारिक शॉल देखील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आली आहे.