कोलकाता : तापमानानं चाळीशी पार केली असतानाही पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातही विक्रमी मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील आठ जागांसाठी आज मतदान झालं. जवळपास ७६ टक्के मतदान येथे झालं आहे. पश्चिम बंगालमधील. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं चाळीशी पार केल्यामुळे मतदारांनी सकाळीच मतादानासाठी रांगा लावल्या. मतदार केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील मतदारसंघ असलेल्या असनसोलमध्ये काही हिंसात्मक घटना घडल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे मतदानाला हिंसेचं गालबोट लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. असनसोलच्या जेमुआ भागात ही घटना घडली आहे. इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला.


केंद्रीय सुरक्षा दलांची नेमणूक केली तरच मतदान करू अशी भूमिका ग्रामस्थांनी केली होती. याच मुद्द्यावरून तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यावेळी पोलिसांना जोरदार लाठीमार करावा लागला. त्यानंतर आरएएफला पाचारण करण्यात आलं.