नवी दिल्ली : देशात चार दहशतवादी घुसल्याची माहिती आहे.  राजधानी दिल्लीमध्ये हे दहशतवादी घुसल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी रात्रीपासून देशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह देशात सर्तक राहण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या विशेष पथकांना छापा मारला. त्यानंतर ही बाबपुढे आली आहे. विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात  हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


निवडणुकीनंतर दिवाळीचा सण आहे. त्यानंतर नाताळचा सण या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता असल्याने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


 दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शहरातील अनेक भागांमध्ये छापे मारले. यावेळी दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी राजधानीमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  सुरक्षा यंत्रणेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.