मुंबई : गाडी मालकांना आपली 15 वर्षांपूर्वीच्या कार रजिस्ट्रेशन रिन्यू करणे पडणार भारी. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी 5000 रुपये भरावे लागतील. जे सध्याच्या स्थितीत आठ पटीने अधिक असणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयने जुन्या गाड्यांच्या नोंदणी प्रमाण पत्राला रिन्यू करण्यासाठी एक सूचना जाहीर केली आहे. महत्वाच म्हणजे हा नियम राष्ट्रीय वाहन धोरणाचा एक भाग असणार आहे. 


परिवहन मंत्रालयाकडून अधिसूचना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या बस किंवा ट्रकसाठी फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आठपट अधिक मोजावे लागेल.


रजिस्ट्रेशन रिन्यू करायला द्यावे लागतील इतके पैसे 


15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण शुल्क सध्याच्या 600 रुपयांच्या तुलनेत 5,000 रुपये असेल. जुन्या दुचाकीच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी, शुल्क सध्याच्या 300 रुपयांच्या तुलनेत 1,000 रुपये असेल. यासह, 15 वर्षांपेक्षा जुन्या बस किंवा ट्रकसाठी फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी शुल्क 1,500 रुपयांवरून 12,500 रुपये करण्यात आले आहे.


अधिसूचनेनुसार, या नियमांना केंद्रीय मोटर वाहन नियम, 2021 म्हटले जाऊ शकते. 1 एप्रिल 2022 पासून ते लागू होतील. फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.