4 मुलांच्या आईचा 14 वर्षाच्या मुलावर जडला जीव, प्रेमात दोघांनीही सोडलं घर, पण...
मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. अभ्यास सोडून तो रोज शेजारच्या घरी जाऊ लागला, तेव्हा त्यांनी त्याच्यावर संशय घेतला आणि शिवीगाळ केली.
मुंबई : असं म्हणतात की प्रेम हे प्रेम असतं. ते कधी कोणावर येईल याचा काही नेम नाही. प्रेम हे कधीही वय पाहात नाही. असंच काहीसं प्रकरण आंध्र प्रदेशातून समोर आलं आहे. येथे एका 4 मुलांच्या आईचं 14 वर्षाच्या मुलावर जीव जडला. त्यांनी काहीही विचार न करता केलेल्या या प्रेमाचा परिणाम काही वेगळाच झाला. ज्याचा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा. या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंधही निर्माण होऊ लागले. दरम्यान, मुलाच्या घरच्यांना त्याच्या विचित्र वागण्याचा संशय आल्याने दोघेही घर सोडून पळून गेले. पोलिसांनी आता दोघांनाही ताब्यात घेतले आहे आणि मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. तर त्या महिलेला न्यायालयात करुन तिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा शहरातील आहे. सर्कल इन्स्पेक्टर व्ही. दुर्गा राव यांनी सांगितले की, ही महिला तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलांसोबत मोबाईल फोनवर गेम खेळायची. दररोज गेम खेळत असताना, ती एका 14 वर्षांच्या मुलाकडे आकर्षित झाली आणि तिने त्याला प्रपोज केले.
मुलाने देखील तिचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर पतीच्या कामावर गेल्यानंतर तिने मुलाला घरी बोलावून शारीरीक संबंध ठेवले.
सर्कल इन्स्पेक्टरच्या म्हणण्यानुसार, मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. अभ्यास सोडून तो रोज शेजारच्या घरी जाऊ लागला, तेव्हा त्यांनी त्याच्यावर संशय घेतला आणि शिवीगाळ केली.
मुलाने हा प्रकार महिलेला सांगितल्यावर दोघांनीही घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि 19 जुलै रोजी ते हैदराबादला पोहोचले. तेथे त्यांनी बालानगर भागात भाड्याने घर घेऊन राहू लागले.
महिला अचानक बेपत्ता झाल्याने तिचा नवरा आणि मुले अस्वस्थ झाली. दरम्यान, मुलगा आणि महिला बेपत्ता असल्याचे पाहून मुलाच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही दिवस हैद्राबादमध्ये राहिल्यानंतर त्या मुलाने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावर महिलेने त्याला घरी पाठवण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले.
यानंतर मुलाने मित्रांना फोन करून मदतीची विनंती केली मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर मुलाने त्याच्या आई-वडिलांना फोन करून सांगितले की, तो हैद्राबादमध्ये आहे आणि त्याला घरी परतायचे आहे.
पालकांमार्फत ही माहिती मिळाल्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांचे एक पथक मंगळवारी तेलंगणातील हैदराबाद शहरात पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेला आणि मुलाला बाहेर काढले, बुधवारी त्यांना गुडीवाडा येथे नेण्यात आले, जिथे मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
तर महिलेला न्यायालयात हजर केले असता तिची कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्कल इन्स्पेक्टरने सांगितले की, महिलेवर अपहरण आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.