Relationship Tips for Couples: हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आणि गरजांमुळे आपल्या नात्यांमध्येही (Effects on Relationships) फार मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationships), लॉन्ग डिस्टंन्स रिलेशनशिप (Long Distance Relationships), डेटिंग (Dating) यांमुळे तयार होणाऱ्या तरूण आणि तरूणींच्या नात्यामध्ये दुरावा येयला आणि भांडणं होयलाही काही शुल्लक कारणं पुरशी असतात. आज आपण सगळेच आपल्या कामात खूप बिझी झालेलो आहोत. त्यातून आपल्याला आपल्या पार्टनरसाठीही (Partners) फार वेळ देता येत नाही. तेव्हा आपल्यालाही त्यानूसार काहीतरी प्रयत्न करावे लागतात नाहीतर आपल्या नातेसंबंधांवर मळभ येतं. त्यामुळे हल्लीच्या जगात आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी आणि जर का आपल्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळा येत असेल तर त्यासाठी तुम्ही योग्य ते प्रयत्न करू शकतात. (Relationship Tips for Couples know the ideas to sustain your estranged relationship lifestyle news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लेखातून आपण जाणून घेऊया की, बिघडलेल्या रिलेशनशिपसाठी तुम्ही कसे आणि कोणत्या प्रकारचे प्रयत्न (How to Fix Relationship) करू शकतात. सध्या जमाना आहे तो म्हणजे ऑनलाईन डेटिंगचा (Online Dating). परंतु यातून अनेकदा फसवी नातीच निर्माण होत असतात. त्यामुळे येथून पुढे आपले नाते जोडले तरी ते किती काळ टिकेल याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे ते नातं टिकवणंही आपल्यासाठी फार कठीण होऊ जाते.


परंतु आपल्या नात्यांमध्ये येणारा दुरावा हा अहंकार, राग, द्वेष आणि निष्काजीपणा अशा काही गोष्टींमुळे कारणीभूत ठरतो. तेव्हा आपले नाते टिकवण्यासाठी आपल्यालाही अशा काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक असते. त्याचबरोबर अनेक बदलही आपल्या पार्टनरच्या (What are the Reasons of Estranged Relationships) कलेनुसार करावे लागतात. 


बिघडलेले नाते कसे टिकवाल? : 


अनेकदा आपल्या पार्टनरच्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि त्या कळल्यावर त्या स्विकारणं कठीण जातं. मग त्या पुन्हा पुन्हा घडू लागल्या की आपली चीडचीड किंवा रागराग होणं स्वाभाविक होऊ बसते परंतु अशा काही गोष्टी तुम्हाला आपल्या पार्टनरच्या दृष्टीनं पाहणं आवश्यक असते. 


व्यक्त व्हा, संवाद साधा :


तुम्हाला जर का असं वाटतं असेल की तुमच्या पार्टनरसोबतच्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये (Communication in Relationship) मोठे अडथळे, वाद निर्माण होत आहेत तर अशा वेळी परिस्थिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून योग्य वेळी व्यक्त होणे आणि आपल्या पार्टनरशी संवाद साधणेही गरजेचे आहे. सोशल मीडिया, फोन नाहीतर मेसेजच्या आधारे तुमचा तुमच्या पार्टनरसोबतचा संवाद सुरू ठेवणे गरजेचे असते. 


समोरच्या व्यक्तीला आपल्या जागी पाहा :


अनेकदा नातेसंबंध बिघडण्याचे मुळ कारण असते ते म्हणजे आपला अहंकार (Negetivity in Relationship) तेव्हा अशावेळी आपला अहंकार मध्ये येऊ देऊ नका. आपल्या पार्टनरच्या जागी स्वत:ला ठेवून पाहा मग कदाचित तुमच्या लक्षात येईल की नक्की त्या व्यक्तीची बाजू काय असू शकते. इतकंच नाही तर त्या व्यक्तीची बाजू समजून घेण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी तुम्हीही आपल्या पार्टनरशी मनमोकळा संवाद साधा. 


मुळात आपल्याला आपल्या भावनांचाही (Emotions in Relationships) वापर करायला हवा. प्रत्येक प्रोब्लेमवर थोडीशी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार एकत्रपणे समस्येवर तोडगा काढायला घ्या. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)