डेहरादून :  हरिद्वार जिल्ह्यातील बहादूराबाद येथील नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकाला मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुरकी-हरिद्वार रोडवर असलेल्या अरिहंत नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्ष, शिक्षक आणि एका विद्यार्थ्यावर त्याच कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने गंभीर आरोप केले.  तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी आरोपी दबाव टाकत होते आणि त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबधितांना अटक केली आहे. या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी बुलंदशहरच्या एका विद्यार्थ्यीनीचे 164 अंतर्गत जबाब नोंदवले आहेत. त्याचबरोबर तिन्ही आरोपींची आरोग्य तपासणी केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कॉलेजच्या वसतिगृहात राहते आणि तिने आरोप केला की, रवी रंजन या वर्गातील विद्यार्थ्याने 16 जानेवारीला तिला मोबाईलवर मेसेज करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि जेव्हा तिने शिक्षक लीजू जेम्स यांच्याकडे तक्रार केली तेव्हा त्यांनीही विद्यार्थ्याची बाजू घेतली आणि उलट तिलाच फटकारले.


शिक्षकाने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबावही आणल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. यानंतर विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार महाविद्यालयाचे अध्यक्ष दीपक जैन यांच्याकडे केली असता जैन यांनीही विद्यार्थिनीला आपल्याशी संबध ठेवायला सांगितले. हवं तर त्या विद्यार्थ्याला व शिक्षकाला महाविद्यालयातून हाकलून देऊ असं म्हटले. परंतू तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 


तिन्ही आरोपींना अटक


याप्रकरणी स्टेशन प्रभारी नितेश शर्मा यांनी सांगितले की, अरिहंत नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष दीपक जैन, शिक्षक लीजू जेम्स आणि विद्यार्थी रवी रंजन यांच्याविरुद्ध कलम ३५४ (अ) ३५४ (डी) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीला महाविद्यालयातील महिला शिक्षिकेने संपूर्ण कॉलेजसमोर अपमानित करण्याची आणि कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली आहे.


विद्यार्थिनीला परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष 


विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, तिचा विनयभंग करण्यात आला आणि आरोपी शिक्षकाने तिला एक दिवस तिच्या खोलीत डोके मसाजसाठी बोलावले होते. शिक्षकाने विद्यार्थिनीला लग्नाचा प्रस्तावही दिला आणि संबंध ठेवल्यास परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आश्वासन दिले.