बंगळुरु : कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत चाचणी आधी नाटक सुरु आहे. सगळेच पक्ष आमदार आपल्या बाजुने असल्याचा दावा करत आहे. पण याचा फैसला 4 वाजता होणार आहे. बहुमत सिद्ध होण्याआधीच जेडीएससाठी टेन्शन वाढलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवल्यानंतर त्यांचा एक नातेवाईक नाराज आहे. मतदानाआधी जेडीएससाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुमारस्वामी यांचा हा नातेवाईक भाजपच्या संपर्कात आहे. भाजप सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. अशातच दर फ्लोर टेस्ट झालं तर तर 6 जेडीएसचे आमदार अनुपस्थित राहू शकते.


दुसरीकडे काँग्रेसचा दावा आहे की, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसचे दोन आमदार आधीच विधानसभेत पोहोचलेले नाहीत. ते देखील भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचा दावा आहे की भाजपचे आमदार सोमशेखर रेड्डी देखील गायब आहेत.


भाजपने म्हटलं आहे की त्यांचे सगळे आमदार त्यांच्या सोबत आहेत. सोमशेखर रेड्डी काँग्रेसच्या दोन आमदारांना आणण्यासाठी गेले आहेत.