Mukesh Ambani Net Worth : मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स उद्योग समुहाच्या व्यवसाय क्षेत्रातील योगदानाची चर्चा जगभरात सुरू असते. संपूर्ण जगातील, आशिया खंडातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही त्यांचं नाव घेतलं जातं. अशा या मुकेश अंबानी यांच्या गडगंज श्रीमंतीच्या डोलाऱ्याला सध्या मात्र हादरा बसताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै महिन्यापासूनच देशातील सर्वधिक किमतीची कंपनी म्हणून नावलौकिक असणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या शेअरचा आलेख जुलै महिन्यापासून घसरण्यास सुरुवात झाली होती. ज्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यातही कंपनीचा शेअर सात टक्क्यांनी पडल्याची माहिती समोर आली असून, यामुळं कंपनीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या उत्पन्नामध्येही घट नोंदवण्यात आली आहे. 


ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार अंबानींच्या एकूण उत्पन्नामध्ये सोमवारी 893 मिलियन डॉलर इतकी घट होऊन हा आकडा 96.2 अब्ज डॉलरवर पोहोचला. यंदाच्या वर्षी त्यांच्या उत्पन्नामध्ये 135 मिलियन डॉलरचा अर्थात साधारण  11,39,09,82,385.50 रुपयांचा तोटा नोंदवला गेला. 2024 मधील ही पहिलीच वेळ आहे, जिथं अंबानींच्या उत्पन्नाचा आकडा Negative मध्ये पाहायला मिळाला. 


फक्त अंबानीच नव्हे, तर जगभरातील आघाडीच्या 20 धनाढ्य व्यक्तींच्या श्रीमंतीमध्येही यंदाच्या वर्षी घट नोंदवण्यात आली. यामध्ये बर्नार्ड आरनॉल्ड, कार्लोस स्लिम यांच्याही नावांचा समावेश आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : अरे देवा! ताशी 30-40 किमी वाऱ्यासह राज्यात पुन्हा पावसाची शक्यता? मग थंडी कुठंय? 


दरम्यान, अंबानींच्या श्रीमंतीविषयी सांगावं तर, जगभरातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचं 17 वं स्थान असून, आशिया खंडात श्रीमंतांच्या यादीत ते अग्रस्थानी आहेत. रिलायन्सच्या शेअरचा एकंदर आढावा घ्यायचा झाल्यास मंगळवारी हा शेअर फ्लॅट 1273.10 रुपयांवर बंद झाला. सप्टेंबर तिमाहीच्या आकडेवारीनंतरच रिलायन्सच्या शेअरची घसरगुंडी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता झालेला हा तोटा रिलायन्स उद्योग समुह आणि पर्यायाने मुकेश अंबानी कसे भरून काढतात याकडेच संपूर्ण उद्योग विश्वाचं लक्ष असेल.