मुंबई : मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आज देशातील सर्वात मोठी कंपनी ठरलीय. याबाबतीत रिलायन्सनं टीसीएसला मागे टाकलाय. मंगळवारी कंपनीचं मार्केट कॅप ७.५१ लाख करोड रुपयांवर दाखल झालंय. तर टीसीएसच्या (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे मार्केट कॅप घसरून ७.४३ लाख करोड रुपयांवर दाखल झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्सच्या पहिल्या तिमाहीची (एप्रिल-मे-जून २०१८) मिळकत आणि नफा अंदाजापेक्षाही चांगला राहिला. त्यामुळेच कंपनीच्या शेअर्सचा भाव वधारता राहिला.


देशातील टॉप १० कंपन्या


बाजारमूल्यानुसार रिलायन्स इंडस्ट्री देशातील सर्वात मोठी कंपनी ठरलीय. तर दुसऱ्या स्थानावर आहे टीसीएस... तिसऱ्या नंबवर आहे एचडीएफसी...


(किंमत लाख करोड रुपयांत)


१. रिलायन्स इंडस्ट्री - २.५१ 


२. टीसीएस - ७.४३ 


३. एचडीएफसी - ५.७२


४. हिंदुस्तान युनिलिव्हर - ३.६८


५. आयटीसी - ३.६३


६. एचडीएफसी - ३.३३


७. इन्फोसिस - २.९३


८. मारुती सुझुकी - २.८६


९. स्टेट बँक - २.६३


१०. कोटक महिंद्रा - २.४७