Mukesh Ambani:  घर किंवा कार खरेदी करायची असेल तर सर्वसामान्यांकडे कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. इतकचं नाही तर अनेक जण मोबाईल फोन देखील कर्ज घेवून खरेदी करतात. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ आलेय. मुकेश अंबानी यांना तात्काळ  255000000000 इतक्या कर्जाची गरज आहे. अंबानी यांना इतके कर्ज कशासाठी पाहिजे याचे कारण समजल्यावर तुम्ही डोक्यावर हात माराल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या व्यवसाच्या मोठा डोलारा आहे. अनेक कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांनी गुंतवणूक केलेली आहे. अनेक कंपन्यांमधून अंबानी चांगला नफा कमावतात. असे असताना मुकेश अंबानी यांना  3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 25500 कोटी रुपयांची गरज आहे.


मुकेश अंबानी यांना त्यांच्या कंपनीवर मोठे कर्जआहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार  2025 पर्यंत अंबानी यांना हे कर्ज फेडायचे आहे. सर्व कर्ज फेडण्यासाठी अंबानी   25500 कोटी रुपयांचे कर्ज घेणार असल्याचे समजते. 
कर्ज फेडण्यासाठी नविन कर्ज मिळावे यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने अर्धा डझन बँकांशी चर्चा केल्याचे समजते. रिलायन्स इंडस्ट्रीजवर आधीच  2.9 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. यापूर्वी 2023 मध्येही कंपनीने 8 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते.  55 बँकांनी एकत्रितपणे रिलायन्स जिओ आणि त्याच्या इतर सहाय्यक कंपन्यांना कर्ज दिले होते. 


मागील सहा महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  रिलायन्सच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यात मोठी पडझड पहायला मिळाली. रिलायन्सचे शेअर्स उच्चंकी दराने गडगडले.  कंपनीचे तिमाही निकाल आणि मार्केट कॅप यांचा परिणाम शेअर्सवर दिसून आला. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यामुळे अंबानी या कर्ज फेडण्यासाठी नविन कर्ज घेण्याची गरज आहे.