5g Spectrum Auction : `या` दिग्गज कंपनीकडून 88 हजार कोटींचं स्पेक्ट्रम खरेदी; 5G नेटवर्कवर मिळवलं वर्चस्व
5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ (Reliance Jio) सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.
5g Spectrum Auction Update : 5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ (Reliance Jio) सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. कंपनीने 88,078 कोटी रुपयांची बोली लावून पुढच्या 20 वर्षांसाठी लिलावात विकल्या गेलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी जवळ-जवळ अर्धा हिस्सा ताब्यात घेतला आहे.
5G Spectrum : 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाकडे देशभरातील लोकांचं लक्ष लागून होतं. रिलायन्स जिओ ही कंपनी सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून समोर आली आहे. कंपनीने 88,078 कोटी रुपयांची बोली लावून पुढच्या 20 वर्षांसाठी एकूण स्पेक्ट्रमपैकी जवळपास अर्धा हिस्सा मिळवला आहे. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात, Jio ने 700MHz बँडसोबतच 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz विविध बँडमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. जर 700 मेगाहर्टझ बँडचा वापर केला तर एक टॉवर बऱ्याच मोठ्या क्षेत्राला कव्हर केलं जाऊ शकतं.
सरकारने दिलेली माहिती
ऑक्टोबर 2022 पर्यंत 5G सेवा सुरू करता येईल, असं दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबत सरकारने लिलावाच्या पहिल्याच दिवशी माहिती दिली होती की, लिलावाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचबरोबर 2015 ची विक्रमी पातळीही ओलांडली आहे. याआधी 2015 मध्ये स्पेक्ट्रमच्या लिलावातून 1.09 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला होता.
कोणी किती बोली लावली?
अदानी समूहाने 26 मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने 19,867 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम 43,084 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. त्याचबरोबर, व्होडाफोन आयडियाने 18,784 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
देशभरात 5G चं नेटवर्क येणार
"4G नंतर आता Jio कंपनी 5G च्या युगात भारताचं नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. आम्ही संपूर्ण भारतात 5G रोलआउटसोबतच 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करू. Jio जागतिक दर्जाच्या, परवडणाऱ्या 5G आणि 5G-सक्षम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच, यामुळे शिक्षण, आरोग्य सेवा, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स या क्षेत्रांना देखील चालना मिळेल." असं मत Reliance Jio Infocomm Limited चे अध्यक्ष आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांनी मांडलं.