Jio चे 5 नवे पोस्टपेड प्लान लॉन्च
टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने मंगळवारी नवे पोस्टपेड प्लानची घोषणा केली आहे.
मुंबई : टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने मंगळवारी नवे पोस्टपेड प्लानची घोषणा केली आहे. Jio Postpaid Plus च्या नावाने प्लान जाहीर करण्यात आले आहेत. कंपनीने म्हटलं की, Jio Postpaid Plus प्लान मध्ये यूजर्सला चांगली कनेक्टिविटी आणि शानदार मनोरंजनाचा अनुभव मिळणार आहे.
काय आहे प्लान?
Jio Postpaid प्लस प्लानमध्ये यूजर्सला फ्लाईट कनेक्टिविटी, स्वस्त फॅमिली प्लान, स्वस्त ISD कॉलमध्ये OTT कंटेंट मिळणार आहे. Jio Postpaid प्लसच्या फीचर्समध्ये अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.
फॅमिली प्लान?
फॅमिली प्लानचं कनेक्शन 250 रुपयांच्या मासिक शुल्कपासून सुरु होईल. ग्राहकांना फ्लाईट कनेक्टिविटी, इंटरनेशनल वायफाय इंटरनेट वर 1 रुपए/मिनिट आणि ISD वर 50p/मिनिटापासून सुरु आहे. कॉलिंगची फॅसिलिटी देखील मिळणार आहे.
399 रुपयांपासून सुरु होणाऱ्या जिओ पोस्टपेड प्लस प्लानमध्ये यूजर्सला 500 जीबीपर्यंत डेटा, अनेक सर्विसेस सह अमेरिका आणि UAE मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कॉल्सचे फायदे मिळणार आहेत. जिओ पोस्टपेड प्लसमध्ये 399 रुपये, 599 रुपये, 799 रुपये, 999 रुपये आणि 1,499 रुपयांचा प्लान आणला आहे. हे सगळे पॅक युजर्सला वेगवेगळ्या गरजेनुसार मिळणार आहेत.
फीचर्स प्लस
250 रुपए प्रति कनेक्शन वर फॅमिली प्लान
500 जीबी डेटा.
जगभरात वाय-फाय कॉलिंग.
इंटरनेशनल प्लस
परदेश यात्रा करणाऱ्या भारतीयांना फर्स्ट इन-फ्लाइट कनेक्टिविटी.
अमेरिका आणि UAE मध्ये फ्री इंटरनॅशनल रोमिंग.
इंटरनॅशनल रोमिंगवर भारतात वाय-फाय कॉलिंगसह 1 रुपयात कॉलिंग.
इंटरनॅशनल कॉलिंग 50 पैसे प्रति मिनिट पासून