Zee Business : 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. संपूर्ण देशाचं लक्ष अर्थमंत्री सीतारमन यांच्या भाषणाकडे लागलं होतं. टीव्हीवर करोडो भारतीय अर्थमंत्र्यांचं भाषण पाहात होते आणि या दिवशी सर्वाधिक लोकांची पसंती मिळाली ती झी समुहाच्या झी बिझनेस चॅनेलला.  झी बिझनेसने बजेट कव्हरेजदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केली. झी बिझनेसने केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बजेट भाषणावेळी तब्बल 85.8 टक्के इतका भरघोस मार्केट शेअर मिळवला. अर्थविषयक बातम्यांमध्ये झी बिझनेसच नेतृत्व करत असल्याचं यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. यामुळे अर्थविषयक बातम्या म्हंटलं की झी बिझनेस (Zee Business) चॅनल हे समीकरण सिद्ध झालंय.


नंबर वन बिझनेस चॅनेल
बिझिनेस चॅनलसाठी बजेट हा अत्यंत महत्ताचा दिवस असतो. 2024 ला अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेलं बजेट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पसंती दिली ती झी बिझनेसलाच. झी बिझनेसने बजेट कव्हरेजदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केलीय.  85.8 टक्के इतका मार्केटशेअर एकट्या झी बिझनेसने काबीज केलाय. झी बिझनेसच्या या उल्लेखनीय कामगिरीत नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा होता. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत जे बजेट भाषण केलं ते पाहण्यासाठी तब्बल 85.8 टक्के लोकांनी पसंती दर्शवलीय. हा अभूतपूर्व मार्केट शेअर झी बिझनेसने मिळवलाय. बिझनेस चॅनेलमध्ये पुन्हा एकदा झी बिझनेसने नंबर वनचा ताज पटकावला आहे.