नवी दिल्ली : कारगिल दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहिदांची आठवण काढली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की, सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत देशवासियांनी देखील युद्धात पूर्ण सहयोग दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम नरेंद्र मोदी यांनी जवानांचं बलिदान आणि शौर्य याची आठवण केली. शूर जवानांनी देशाचे गौरव आहेत. जे कारगिल युद्धामध्ये देखील आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी खूप लढले.


कारगिलच्या युद्धाला १८ वर्ष पूर्ण झाले. २६ जुलै १९९९ भारतीय जवानांनी  कारगिलमध्ये तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशभरात जवानांना सलामी दिली जाते.