Repo Rate Hike : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. RBI रेपो दर वाढवू शकते. आरबीआयने असे केल्यास तुमच्यावर ईएमआयचा अतिरिक्त बोजा वाढेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुन्हा रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. रेपो दरात वाढ केल्यास गृहकर्ज, कार कर्ज घेणार्‍यांवर ईएमआयचा बोजा वाढू शकतो.


आरबीआय गव्हर्नर यांचे संकेत


हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे सरकारवरचा बोजा वाढणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी एमपीसी व्याज दर वाढवत राहील, परंतु रेपो रेट प्री-कोविड पातळीपर्यंत वाढेल हे सांगणे खूप घाईचे आहे.


शक्तिकांता दास म्हणाले, 'दर वाढीचा अंदाज बांधणे फार अवघड काम नाही. रेपो रेट थोडा वाढेल, पण किती वाढेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पण तो वाढून ५.१५ टक्के होईल, असे मानणे योग्य ठरणार नाही. एमपीसीला पुढील बैठकीत दर वाढवायचा आहे, हा बाजाराचा अंदाज बरोबर आहे.


एमपीसीची बैठक कधी होणार?


आरबीआय एमपीसीची बैठक 6 ते 8 जून दरम्यान होणार आहे. यानंतर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास 8 जून रोजी एमपीसीच्या बैठकीच्या निर्णयांबद्दल सांगतील.