नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला 14 हजार कोटी रूपयांचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून नीरव मोदी राहत असलेल्या अपार्टमेंटची किंमत जवळपास 60 करोड रूपये असून त्या घराचे भाडे महिन्याला 16 लाख रूपये इतके आहे. ब्रिटनच्या 'द टेलीग्राफ'ने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, 13,500 कोटी रूपयांची फसवणूक करणारा नीरव मोदी सेंटर पॉइंट टॉवर ब्लॉकच्या एका मजल्यावर तीन बेडरूमच्या घरात राहत असल्याचे सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नीरव मोदीने पुन्हा हिऱ्यांचा व्यापार सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली होती. अहवालातून दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीने पेंन्शन विभागाद्वारा नॅशनल इंन्शुरन्स नंबर प्राप्त केला असून भारतीय अधिकारांपासून वंछित असूनही नीरव मोदी ऑनलाइन बँक खाते चालविण्यास सक्षम असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. याआधी टेलिग्राफद्वारा जाहीर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नीरव मोदी वेगळ्याच अवतारात दिसत आहे. यावेळी त्याने घातलेल्या जॅकेटची किंमत जवळपास 10 लाख रूपये असल्याची माहिती समोर आली. परराष्ट्र मंत्रालयाकडून नीरव मोदीला ब्रिटनमधून बाहेर काढून त्याच्यावर कायदेशीर कारवाई कऱण्यासाठी सरकार सर्वोतोपरी पावले उचलत असल्याचे सांगण्यात आले आहे. 



परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची माहिती असली तरी त्याला तात्काळ भारतात आणले जाऊ शकत नाही. याची एक प्रक्रिया आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे विनंती करण्यात आली आहे. ब्रिटन नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या विनंतीवर विचार करत असल्याचेही रवीश कुमार यांनी सांगितले.