नवी दिल्ली : दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या, संचलनावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत जागा देण्यात आल्याची माहिती एका काँग्रेस नेत्यानं दिलीये. PTIनं दिलेल्या वृत्तानुसार इतिहासात प्रथमच काँग्रेस अध्यक्षांना एवढ्या मागे बसावं लागणार आहे. 


नरेंद्र मोदी सरकार हीन राजकारण करत असल्याचा आरोप


नरेंद्र मोदी सरकार हीन राजकारण करत असल्याचा आरोप या नेत्यानं केला आहे. मात्र अधिकृतरित्या कोणत्या नेत्यांना कोणत्या रांगेत बसवणार याची माहिती कुणीही दिलेली नाही. कोणत्याही रांगेत जागा दिली असली तरी राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचंही या काँग्रेस नेत्यानं स्पष्ट केलं आहे.