दिल्ली : दरवर्षी प्रजासत्तकदिनानिमित्त प्रत्येक राज्यांकडून खास चित्ररथ सादर केले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षीच्या महाराष्ट्राकडून सादर केल्या जाणार्‍या चित्ररथाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. 


शिवराज्याभिषेकाचा सोहळा रंगणार 


 प्रजासत्ताकदिनाला राजपथावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला जात असून  चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार आहे. 


 
  शिवराज्याभिषेक सोहळा देखाव्याची वैशिष्टय...


- शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 


- शिवाजी महाराजांच्या न्यायाचे तराजू दर्शवण्यात आले आहेत.
- पताका आणि भाले घेऊन मावळ्यांची प्रतिकृती
- मेघडंबरीत महाराज सिंहासनावर बसलेले दाखवण्यात आले आहे.
- १० जिवंत कलाकार असतील. त्यात  शिवाजी महाराज, जिजाऊ, सोयराबाई, संभाजी महाराज, गागाभट्ट, इंग्रजी अधिकारी सर हेंन्द्री आॅक्सीडन
- राजमुद्रा तसेच शिवराई आणि होण अशी नाणी दाखवण्यात आली आहेत.