नवी दिल्ली : भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर आयोजित सोहळ्यात १० देशांचे प्रमुख आणि शासनाध्यक्ष उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशियातील भरताचे वाढते महत्त यातून दिसते. राज्य, मंत्रालय, आकाशवाणी सारख्या २३ चित्ररथांनी राजपथाची शान वाढवली.


महाराष्ट्र 



महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज दाखविण्यात आले. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन देसाई यांनी हा सेट बनविला होता.


आसाम 



आसामचे चित्ररथ रामायणाला समर्पित होते. रामायणातील प्रमुख कॅरेक्टर यामध्ये दिसले.


काश्मीर 



जम्मू काश्मीरचा चित्ररथही दिसला. यामध्ये तिथली संस्कृती पाहायला मिळाली.


कर्नाटक 



कर्नाटकच्या चित्ररथाने तिथल्या वन्य जीवनाला समोर आणले.


हिमाचल प्रदेश 



हिमाचल प्रदेशच्या चित्ररथाने भगवान बुद्धाच्या मुर्तीला प्रमुख स्थान दिले.


आकाशवाणी 



यावर्षी परेडमध्ये आकाशवाणीचा चित्ररथही पाहायला मिळाला. यामध्ये पंतप्रधानांचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम 'मन की बात' चित्र रुपात आणण्यात आली. 



कृषि क्षेत्रात शोध करणारी सरकारी संस्था कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) चा चित्ररथही पहिल्यांदा प्रजासत्ताकदिनी पाहायला मिळाला.