मुंबई : सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपल्याला थक्कं करतात. सध्या सोशल मीडियावर आपल्यासमोर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये  पूर आल्याने कालव्यातील जोरदार प्रवाहात एका माणसाला वाचवण्यासाठी दोन पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करतात प्रयत्न करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ लोकसभा खासदार आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्वत: शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सद्दाम शेख आणि अजित पोकरे असे त्या दोन पोलीस हवालदार यांचे नाव आहे. त्यांनी पुण्यातील दत्तवाडीच्या शिवणे गावातील बागुल उद्यानात एका ओढ्यामध्ये वाहुन जात असलेल्या नागरिकासाठी आपले प्राण धोक्यात टाकले आणि त्याची सुटका केली.


सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिलं, "दत्तवाडी, पुणे पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे यांनी शिवणेतील बागुल उद्यानालगतच्या ओढ्यात वाहून जात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले. स्वतः जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेले शौर्य 'सदरक्षणाय खलनिग्रहनाय' हे ब्रीद सार्थ ठरवणारे आहे. त्यांच्या कामगिरीला सलाम!"


या दोन पोलिसांच्या शौर्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.



मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनियंत्रितपणे पाऊस पडत आहे. ज्यामुळे तेथे पुरपरिस्थीती निर्माण होत झाली आहे. त्यामुळे बचाव उपाययोजना करत, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) राज्यातील अशा भागात 17 पथके तैनात केली आहेत, जिथे मुसळधार पाऊस पडत आहे.