मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने चार सहकारी बँकांना एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, हा दंड अनुपालनात चुकांसाठी लावण्यात आला आहे. दंड लावला असला तरी RBI ने या बँकांच्या ग्राहकांशी व्यवहार आणि कराराच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थितीत केलेले नाही. या बँकांमध्ये 3 बँका महाराष्ट्रातील तर एक बँक मध्य प्रदेशातील आहे.


कोणत्या बँकेवर किती दंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील 'अंडरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके'ला दीड लाख रुपये आणि 'महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला' एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँके'ला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील शहडोल येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


----


RBI चे निर्बंध! या बँकेच्या ग्राहकांना फक्त 5 हजारापर्यंत रक्कम काढता येणार


ग्राहकांच्या पैसे काढण्यासोबतच, RBIने बँकेला कर्ज देण्यास करण्यास बंदी घातली आहे. यासाठी बँकेला आता आरबीआयची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. 8 एप्रिल 2022 पासून रिझर्व्ह बँकेने हे सर्व निर्बंध लागू केले आहेत.


5,000 पेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी
आर्थिक शिस्त बिघडल्याने आरबीआयने हा निष्कर्ष काढला आहे. बेंगळुरूच्या शुश्रुती सौहर्दा सहकारी बँक नियामिता(Shushruti Souharda Sahakara Bank Niyamita)वर निर्बंध लादले आहेत आणि बँकेच्या ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यास बंदी घातली आहे. त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून 5,000 रुपयांपेक्षा जास्त रोख काढू शकणार नाहीत.