Reserve Bank Of India New Rule: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आता आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर नोटांची योग्यता तपासली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना नोटा मोजण्याऐवजी नोटांची फिटनेस तपासण्यासाठी मशीन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरबीआयच्या या सूचनेनुसार आता दर तीन महिन्यांनी नोटांचा फिटनेस तपासला जाईल. तुमच्या खिशात ठेवलेली नोट योग्य की अयोग्य आहे? हे तपासण्यासाठी आरबीआयने 11 मानके निश्चित केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खराब नोटा कशा ओळखायच्या?


  • ज्या नोटा अतिशय घाणेरड्या अवस्थेत असून भरपूर धूळ आहे, त्या नोटा अयोग्य समजल्या जातील.

  • नोट बराच काळ चलनात राहिल्याने नरम पडते. नरम पडलेल्या नोटा यापुढे अयोग्य समजल्या जातील. तर कडक नोटांचा समावेश चांगल्या श्रेणीत केला जाईल.

  • कोपऱ्यावरून किंवा मध्यभागी फाटलेल्या नोटा अयोग्य समजल्या जातील.

  • नोट क्षमतेपेक्षा जास्त दुमडलेली असले म्हणजेच क्षेत्रफळ 100 चौरस मिलिमीटरपेक्षा जास्त असल्यास ती नोट अयोग्य मानली जाईल.

  • 8 चौरस मिलिमीटरपेक्षा मोठे छिद्र असलेली नोटअयोग्य  मानली जाईल.

  • नोटमधील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाईल.

  • नोटेवर खूप डाग, पेनाची शाई इत्यादी असतील तर ती नोट अनफिट असेल.

  • नोटांवर काही लिहिले असल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या पेंटिंग असल्यास अयोग्य असेल.

  • नोटेचा रंग उडाला तर ती नोट अनफिट मानली जाईल.

  • फाटलेल्या नोटेवर कोणत्याही प्रकारचा टेप किंवा गोंद असल्यास त्या नोटा अयोग्य समजल्या जातील.

  • नोटांचा रंग गेला असेल किंवा फिकट झाला असेल तर त्यांचाही समावेश अनफिटच्या श्रेणीत केला जाईल.


अनफिट नोट मशीनचा वापर


आरबीआय अनफिट नोट ओळखण्यासाठी अद्ययावत पद्धतीने मशीन बनवत आहे. मशीन अनफिट नोटा ओळखून बाजूला करेल. आरबीआयने सर्व बँकांना या मशिनचा योग्य वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, त्याची काळजी गांभीर्याने घेण्याची सूचना केली आहे.