Reserve Bank Of India: तुमच्या खिशात 2000 रुपयांची नोट आहे का? त्यासंदर्भातील एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. साधारण 6 वर्षांपूर्वी देशात नोटबंदीचा (Demonetization) आदेश देण्यात आला होता. ज्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. देशात डिजिटल (Digital Payments) पद्धतीनं व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यातच सध्या नोटबंदीच्या निर्णय़ानंतर Reserve Bank Of India नं 2000 रुपयांच्या नोटेसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाएकी 2 हजार रुपयांची नोट दिसण्याचं प्रमाण अगदी कमी झालं आहे. याचसंदर्भात आरबीयानं महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. जाणून आश्चर्य वाटेल, पण मागील 3 वर्षांपासून 2 हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. परिणामी Circulation मध्ये ही नोट जवळपास नसण्यातच जमा आहे. 


वाचा : G-Pay : गूगल पे ला आरबीआयची मान्यता नाही?


RTI च्या माहितीनुसार 2019-20, 2020-21 आणि 2021-22 दरम्यान 2 हजार रुपयांची एकही कोरी नोट छापण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला RBI कडून बाजारात 2 रुपये, 5 रुपये, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. 


2016 मध्ये नोटा बंद... 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनांतून बाहेर केल्या होत्या. याऐवजी चलनांमध्ये 2000 आणि 500 रुपयांची नवी नोट आली होती. 


किती टक्क्यांनी कमी झाल्या 2000 रुपयांच्या नोटा? 


देशात पंतप्रधानांच्या आदेशानंतर नव्या नोटा दारी करण्यात आल्या. पण, त्यानंतर मात्र आता 2 हजार रुपयांच्या नोटा फारच कमी प्रमाणात दिसू लागल्या आहेत. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत देशभरात 2000 रुपयंच्या नोटांची भागिदारी 13.8 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळं तुमच्या खिशात 2 हजार रुपयांची नोट असल्यास ती फार कमी नोटांपैकीच एक आहे असं समजा. 


विश्वास बसणार नाही पण हे खरंय.... 


देशभरात बनावट नोटांनीही बराच व्यवहार होत आहे. 2018 मध्ये भारतात बनावट नोटांचा आकडा 54776 इतका होता. तर, 2019 मध्ये हा आकडा 90566 वर पोहोचला. 2020 मध्ये हेच प्रमाण  2,44,834 नोटांवर पोहोचलं.