Reserve Bank of India: अनेकदा बाजारात किंवा इतरत्र युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी UPI वर कोणतेही शुल्क लागणार नाही. आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. (RuPay Credit Cards on UPI)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI ने परिपत्रकाचा आदेश 4 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. रुपे क्रेडिट कार्ड गेल्या चार वर्षांपासून चलनात आहे. देशातील सर्व प्रमुख बँका याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. आरबीआयने मंगळवारी (4 ऑक्टोबर) जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 'अ‍ॅपवर क्रेडिट कार्ड लिंक करणे आणि UPI पिन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड सक्षम करण्यासाठी ग्राहकाची संमती आवश्यक आहे.'


2,000 तसेच यापेक्षा कमी रकमेवर शुल्क नाही


एनपीसीआईने (NPCI)सांगितले की, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अॅपची विद्यमान प्रक्रिया क्रेडिट कार्डांनाही लागू होईल. या श्रेणीसाठी 2,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेपर्यंतच्या व्यवहारासाठी शून्य व्यापारी सवलतीचा दर (MDR) लागू होईल, असेही त्यात म्हटले आहे.


नवा नियम 4 ऑक्टोबरपासून लागू 


आरबीआयने दिलेल्या माहिती देताना सांगितले की, हे परिपत्रक जारी केल्याच्या तारखेपासून लागू होईल. म्हणजेच हा नियम 4 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. आरबीआयने असेही म्हटले आहे की सदस्यांनी याची नोंद घ्यावी आणि या परिपत्रकातील मजकूर संबंधित भागधारकांच्या निदर्शनास आणून द्यावा.


आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी यापूर्वी सांगितले होते की, “क्रेडिट कार्ड्स UPI शी लिंक करण्याचा उद्देश ग्राहकांना पेमेंट पर्यायांची विस्तृत निवड प्रदान करणे आहे. सध्या UPI डेबिट कार्डद्वारे बचत खाती किंवा चालू खात्यांशी जोडलेले आहे.