लवकरच २०० रुपयांची नोटही येणार?
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
मुंबई : नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
काळ्या पैशांवर आणि नकली नोटांवर ताबा ठेवण्याच्या उद्देशानं आरबीआय हे बदल करण्याच्या मार्गावर आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात २०० रुपयांच्या नोटेची घोषणा होऊ शकते.
१०० आणि ५०० रुपयांच्या दरम्यानची कोणतीही नोट सध्या बाजारात उपलब्ध नाही, त्यामुळे २०० रुपयांच्या नोटेचा चांगलाच फायदा होऊ शकतो... हे ध्यानात घेऊनच आरबीआयनं २०० रुपयांच्या नोटेचा घाट घातल्याचंही काहीचं म्हणणं आहे.
२०० रुपयांच्या नोटेचा फायदा म्हणजे, कॅश देवाण-घेवाण सुटसुटीत होईल तर एकूण चलनात छोट्या नोटांची संख्याही वाढेल.
उल्लेखनीय म्हणजे, नोटबंदीच्या अगोदर ५०० रुपयांच्या १७१७ करोड नोट होत्या तर १००० रुपयांच्या ६८६ करोड नोटा होत्या. एसबीआयच्या एका अहवालानुसार, नोटबंदीनंतर मोठ्या नोटांच्या शेअर्समध्ये ७० टक्के मंदी दिसतेय.