नवी दिल्ली : नोट बंदीनंतर २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटात चलनात आल्या. त्यानंतर ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यात. आता १०० रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून तशी तयारी करण्यात आली असून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. मात्र, शंभर रुपयांची जुनी नोटही चलनात कायम असणार आहे.  १०० रुपयांच्या या नव्या नोटेचा रंग हलका जांभळा ( लवेंडर) आहे.


या नोटेमध्ये पुढील बाजूस महात्मा गांधीजींचे छायाचित्न, मागच्या बाजूला भारतीय सांस्कृतिक वारसा दर्शवणारी गुजरातच्या ऐतिहासिक राणीची विहीर दाखवण्यात आली आहे. या नोटेचा आकार जुन्या शंभर रुपयाच्या नोटेपेक्षा कमी आहे.