पटियाला : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच धर्तीवर काही ठिकाणं सीलही करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता, सर्व नागरिकांना घरातच राहून या विषाणूचा संसर्ग टाळण्याचं आवाहन खुद्द पंतप्रधानांनीही केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यावश्यक सेवा आणि स्वच्छता सुविधा पाहता इतर सर्व कामंही ठप्प झाली आहेत. या साऱ्यामध्ये देशभरातील विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जिथे सुरक्षेच्या कारणास्तव घरांमध्ये आहेत, तिथेच आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणारे स्वत्छता कर्मचारी मात्र शहरंच्या शहरं स्वच्छ करण्याचं काम अविरतपणे करत आहेत.


समाजासाठी झटणाऱ्या याच सफाई कर्मचाऱ्यांप्रती नागरिकांनीही आभाराची भावना व्यक्त केली आहे. किंबहुना आभार व्यक्त करण्याचं यहे सत्र सुरुच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या एक व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. 



पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही ट्विटरवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये नाभा परिसरातील रहिवासी सफाई कर्मचारी त्यांचं काम करत असताना रहिवाशांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तर, काही मंळींनी त्यांच्या गळ्यात चक्क पैशांचा हार घालून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण देश ऋणी आहे, हेच हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे.