मुंबई : ५ एप्रिलला ९ वाजता ९ मिनिटे सर्वांनी लाईट्स बंद करुन दिवे लावा असे आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याला प्रतिसाद देत देशभरातील जनतेने आपापल्या घरातील दिवे बंद केले आणि पणत्या, मेणबत्या, मोबाईल टॉर्च पेटवले. तसेच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.सर्वसामान्य जनतेसोबत राजकारण, मनोरंजन, क्रिडा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी या आवाहनला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या राहत्या घरी पणत्या पेटवून यात सहभाग घेतला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या घरची लाईट बंद करत पत्नीसह घराबाहेर पणत्या ठेवल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या परिवारासह दिवे लावत यात सहभाग घेतला. 



रात्री ठिक नऊ वाजता शहरातील लाईट्स बंद झाल्या. आणि प्रत्येकाच्या खिडक्यांमधून दिवे, पणत्या दिसू लागल्या. जनतेने घोषणा तसेच शंखनाद करत करत या आवाहनाला प्रतिसाद दिला. 



कोरोना व्हायरच्या या प्रादुर्भावामुळे जो अंधकार देशात पसरला आहे, त्याचा सर्वांनीच एकजुटीने प्रतिकार करत या अंधकारावर एकजुटीच्या प्रकाशाने मात करायची आहे, हा अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश त्यांनी दिला. मोदींच्या या संबोधनपर भाषणातील काही महत्त्वाचे आणि लक्षपूर्वक वाचण्याजोगे मुद्दे खालीलप्रमाणे 



* कोरोना व्हायरसचा हा अंधकार देशातील १३० कोटी नागरिकांनी एकजुटीने मिटवायचा आहे. 



* कोरोनाचा परिणाम गरीबांवर सर्वाधिक झाला आहे. कामगारांचे लोंढे रस्त्यावरून निघालेले दिसत होते. त्यांचे घरभाडे, जेवणाचे हाल झाले. अशा वर्गाप्रती मोदींनी जबाबदारीचं वक्तव्य केलं. 



* अटीतटीच्या या प्रसंगी आपण कोणीही एकटं नाही. जनतारुपी महाशक्तीचा साक्षात्कार करत राहिलं पाहिजे. यामुळेच आपल्याला मानसिक आधार आणि लक्ष्यप्राप्ती होईल.