नवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या खासकरुन भाज्यांचे भाव तेजीने गगनाला भिडले आहेत. बघता बघता ऑक्टोबर महिन्यात हा तर ३.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या वर्षी मार्चमध्ये 3.8 9 टक्क्यांनंतर रिटेल चलनवाढ होऊन उच्चांक पातळी गाठली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) सप्टेंबरमध्ये ३.२८ टक्के होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४.२ टक्के होता.


चलनवाढीचा दर


सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (सीएसओ) च्या मते, अन्नधान्याच्या वर्गवारीतील चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये १.९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबरमध्ये हा १.२५ टक्के होता.


प्रोटीन्स पदार्थाच भाव


भाजीपाला क्षेत्रात चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये दुपटीने वाढून ७.४७ टक्के झाला. जो सप्टेंबरमध्ये ३.९२ टक्के होता. अंडी आणि दुग्ध अशा प्रोटीन्स पदार्थांचे भावही उच्च आहेत. 


फळ आणि डाळी


दरम्यान, फळांच्या किमती तिमाही आधारावर ऑक्टोबरमध्ये घटल्या. डाळींचे भाव घसरले असून या महिन्यात या महिन्यात २३.१३ टक्क्यांनी घट होऊन सप्टेंबरमध्ये ते २२.५१ टक्क्यांनी घसरले.


किरकोळ महागाईही महत्त्वाची


त्याच वेळी, इंधन आणि वीज तिमाही आधारावर महागले. वाढत्या महागाईचा दर गृहनिर्माण क्षेत्रातही नोंदवला गेला. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणामध्ये किरकोळ महागाई महत्त्वाची आहे. मुख्य बँक मुख्यत्वे या आधारावर प्रमुख धोरण दर निर्धारित करत असते.


बैठकीकडे नजर


आता प्रत्येकाची नजर मौद्रिक धोरण समितीच्या सहाव्या द्वैवार्षिक बैठकीवर असणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील समितीची बैठक ५ ते ६ डिसेंबर रोजी होणार आहे. औद्योगिक उत्पादनातील मंदीमुळे जूनपासून रिटेल चलनवाढीचा दर सातत्याने वाढत आहे.