Investment after Retirement: नोकरी झाल्यानंतर आपल्याला गुंतवणूकीचा फायदा (Investment Planning) करून घेता येतो. पेन्शन नाही मिळालं तरी तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकते. सध्या महागाई (Inflation) ही डोक्यावरून पाणी गेल्यासारखी वाढते आहे. आपल्या गरजा वाढत जात आहेत आणि त्यातून जीवनावश्यक गोष्टींही महाग होऊ लागल्या आहेत. त्यातून आता आपल्यालाही काही प्रमाणात आपल्याला आपल्या वाढत्या गरजांकडेही लक्ष देणे फार महत्त्वाचे झाले आहे. तेव्हा तुम्हीही अनेक गुतंवणूकीचे पर्याय वापरू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की कशाप्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचा जमाना हा फार झपाट्यानं बदलतो आहे त्यातून योग्य ती गुंतवणूक स्ट्रॅटेजी (Investemt Strategy) वापरली की आपल्यालाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. जर का तुम्हालाही रिटायर्डमेंटनंतर योग्य कमाई करायची असेल तर आत्तापासूनच गुंतवणूक करायला सुरूवात करा. ज्याचा तुम्हालाही रिटायर्डमेंटनंतर चांगला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही अजूनही रिटायर्डमेंट प्लॅनिंग केले नसेल तर आत्ताच गुंतवणूक करायला सुरूवात करा. तुम्हाला जर का लॉन्ग टर्म इन्व्हेसमेंट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाही योग्य प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.


किती मिळेल परतावा? 


तुम्ही कोणत्या गुंतवणूकीत इनव्हेसमेंट करत आहात आणि त्यातून तुम्हाला कसे परतावे मिळतील हे जाणून घेणेही तितकेच आवश्यक आहे. तुम्हाला येथे डेट फंड आणि इक्विटीचा पर्यायही उपलब्ध आहे. नोकरीच्या वेळी मिळणारी ग्रॅज्यूईटी आणि प्रॉव्हिडंट फंड यांचाही तुम्ही योग्य प्रकारे वापर करून घेऊ शकता. डेट फंडमध्ये (Date Fund) तुम्हाला 7 ते 9 टक्क्यांचा परतावा मिळेल. डेट आणि इक्विटीमध्ये (Equity) समान गुंतवणूक असेल तर 9 ते 11 टक्क्यांचा परतावा मिळेल. 


इक्विटीमध्ये कशी कराल गुंतवणूक? 


तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हालाही चांगला परतावा (Returns) मिळू शकतो. यातून तुम्हाला जर तुम्ही 69 लाख रूपयांवर इक्विटी फंड ठेवत असाल तर तुम्हाला चांगलाच रिटर्न मिळेल. 


लॉक-इन परियडचा कसा कराल विचार? 


तुम्ही 25 वर्षांची गुंतवणूकही करू शकता. पाच वर्षांच्याही गुंतवणूकीचा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. म्यू्च्युअल फंड (Mutual Funds) प्लान्समध्येही तुम्हाला चांगला फायदा मिळेल. सिनियर सेव्हिंग स्किम, प्रधानमंत्री वय वंदना योजना आणि हायब्रिड स्किमचाही चांगला फायदा होईल. तेव्हा तुम्ही योग्य स्ट्रॅटजी वापरलीत तर तुम्हालाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)