रेवाडी गॅंगरेप : मुख्य आरोपी सेना जवान आणि त्याच्या मित्राला अटक

हरियाणाच्या रेवाडीमध्ये गॅंगरेपचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील मुख्य दोन्ही मुख्य आरोपींना एसआयटीच्या टीमने अटक केली आहे. पंकज आणि मनिष नावाच्या आरोपींची आज धरपकड करण्यात आली.
हरियाणा : हरियाणाच्या रेवाडीमध्ये गॅंगरेपचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील मुख्य दोन्ही मुख्य आरोपींना एसआयटीच्या टीमने अटक केली आहे. पंकज आणि मनिष नावाच्या आरोपींची आज धरपकड करण्यात आली.
या दोघांना नेमकं कुठून उचलण्यात आलंय याबद्दल अद्याप कोणती माहिती देण्यात आली नाही. अटक करण्यात आलेला पंकज हा सेना जवान असून त्याची पोस्टिंग राजस्थानमध्ये होती.
मुलीवर जबरदस्ती
या घटनेतील आणखी एक आरोपी नीशूला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. आरोपींना साथ देण्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलं होतं. यामध्ये डॉक्टर संजीव आणि रुम मालक मालिक दीन दयाल सहभागी आहेत. याच्याच रुमवर पीडित मुलीला जबरदस्ती नेण्यात आलं होतं.
घटनेविषयी...
12 सप्टेंबरला 19 वर्षांची स्टेट बोर्ड टॉपर मुलगी जेव्हा कोचिंगसाठी घरून महेंद्रगढच्या कनीना बसमधून जात होती. रस्त्यातून तिला पळवून रुममध्ये नेण्यात आलं. याठिकाणी तिला नशेचे पदार्थ खायला दिले आणि 12 आरोपींनी साधारण 8 तास बलात्कार केला. पिडितेच्या रिपोर्टनुसार 12 जणांनी बलात्कार केला पण एफआयआरमध्ये फक्त 3 जणांची (नीशू, पंकज आणि मनिष) नाव देण्यात आली.