Shocking VIDEO : जेव्हा गेंडा ट्रकला धडकतो, अपघाताचा VIDEO व्हायरल
Rhino Hit By Truck: एक गेंडा एका वेगवान ट्रकला धडकताना दिसत आहे, ज्यामुळे गेंड्याला...
Shocking Video: जंगलाच्या आजूबाजूला असणाऱ्या महामार्गावर अनेक वेळा जंगलातील प्राणी रस्त्यांवर आवरताना दिसतात. विदर्भातील ताडोबा (Tadoba) परिसरातील महामार्गावर अचानक वाघांचा (tiger) वावर आपण पाहिला आहे. गुजरातमध्येही (Gujarat) वाघांची झुंड महामार्गावर बसलेला व्हिडीओ आपण पाहिला आहे. असाच एक जंगलातील (forest) विशाल प्राण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर (Tweet) हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक गेंडा (Rhino) एका वेगवान ट्रकला धडकताना दिसत आहे, ज्यामुळे गेंड्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर गेंडा कसा रस्त्यावर पडतो आणि पुन्हा जंगलात जातो, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (rhino hit by truck in assam video viral on social media nmp)
हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, 'गेंडे आमचे खास मित्र आहेत. त्यांच्या जागी आम्ही कोणतेही उल्लंघन होऊ देणार नाही. हल्दीबारी येथील या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या गेंड्याची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या अपघातास जबाबदार असलेल्या चालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, आमचे सरकार काझीरंगातील (Kajiranga) प्राण्यांना वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही 32 किमीच्या स्पेशल एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम करत आहोत.