Richa Chadha : अभिनेत्री रिचा चढ्ढाचा माफिनामा, `त्या` ट्विटवर दिलं स्पष्टीकरण
Richa Chadha : सैन्याबाबत अपमानजनक ट्विटवर अखेर रिचा चढ्ढाने मागितली माफी, काय म्हणाली माफिनाम्यात?
Richa Chadha : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) ने त्या ट्विटवर अखेर माफी मागितली आहे. रिचा चढ्ढाने केलेल्या एका ट्विटने वादंग माजला होता. या ट्विटवर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आणि भाजपने आक्रमक पावित्रा घेत माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच तिला या ट्विटवरून ट्रोल देखील करण्यात आले आहे.या ट्रोलिंगनंतर रीचाने (Richa Chadha Apoligize) ट्विट डिलीट करत माफिनामा मांगितला आहे. (richa chadha apologises after being trolled on galwan says hi tweet delet tweet bollywood ali fazal)
हे ही वाचा : Richa Chadha च्या गलवान ट्विटवर अक्षय कुमार भडकला, म्हणाला...
रिचा चढ्ढाची माफी
प्रकरण काय ?
नुकतंच रिचाने (Richa Chadha) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. यावर रिचानं (Richa Chadha Apoligize) उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’असे ट्विट केले होते. या तिच्या (Galwan) गलवानच्या ट्विटमुळे ती रिचा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिचानं तिच्या पोस्टमध्ये तिनं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत होता. तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात आले होते.
भाजपा आक्रमक
रिचाने (Richa Chadha Apoligize) गलवान केलेल्या या ट्विटवर भाजप देखील आक्रमक झाली होती. भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचावर निशाणा साधत, तिचे हे ट्वीट लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. अशाप्रकारे आपल्या सैन्याचा अपमान करणं योग्य नाही, त्यामुळे रिचानं (Richa Chadha) ते ट्विट लवकरात लवकर डिलीट करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भाजपने ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर व ट्रोलिंगनंतर अखेर रिचा चढ्ढाने (Richa Chadha Apoligize) माफी मागितली आहे. ट्विटवरील वादानंतर रिचा चढ्ढाला माफी मागावी लागली आणि आपल्या कुटुंबाच्या लष्कराशी असलेल्या संबंधाचा दाखला द्यावा लागला आहे. यासोबतच तिने गलवानवरील ट्विटही डिलीट केले आहे.
रिचाच्या (Richa Chadha Apoligize) या माफिनाम्यानंतर आता हा वाद इथेच शमण्याची शक्यता आहे.