नवी दिल्ली :  तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये, सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ दरम्यान त्यांच्याकडे ७७.६३ कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५४.९३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 


असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून एक अहवाल सादर केला आहे, त्यात हा दावा करण्यात आला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) आहे. त्यांचे २०१५-१६ मधील एकूण उत्पन्न हे १५.९७ कोटी रूपये इतके होते. 


उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासहित जेकेएनसी, आयएनएलडी, एआययूडीएफ, एजेएसयू, एमजीपीनेही आपले विवरण पत्र सादर केलेले नाही.


एडीआरच्या मते, या वर्षी ४७ पैकी ३२ प्रादेशिक पक्षांनी आपल्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली होती. 


निवडणूक आयोगाकडे१५ पक्षांनी आपला लेखापरिक्षण अहवाल सादर केलेला नाही. आपला लेखापरिक्षण अहवाल, सर्व राजकीय पक्षांना ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करायचा होता.