मुंबई : हैदराबादमध्ये एका भरधाव कारने एका रिक्षाला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. हैदराबादमधील इनॉर्बिट मॉलसमोर ही दुर्घटना घडली आहे. (Audi Car and Rickshaw Accident at Hyderabad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षाला धडक देणाऱ्या ऑडी गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी ऑडी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रवासी हा प्रिझम पबमधील कर्मचारी असल्याचे कळत आहे.  


या अपघाताचा व्हिडिओ सायबरबाद वाहतूक पोलिसांनी ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रस्ता सुरक्षितेबाबत प्रत्येकाने काळजी घेण्याची करज आहे. अपघात टाळण्यासाठी जनजागृतीसाठी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. पाऊस पडला असताना अतिवेगवान कार चालवून रिक्षातील प्रवाशाच्या मृत्यूला कार चालक जबाबदार आहे.


कारने रिक्षाला इतकी जोराची धडक दिली की, रिक्षाने तीन ते चार वेळा फिरकी घेतली आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला. त्यांच्यावर अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.