नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विना लग्न म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या बालकांचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, जर जोडपे बऱ्याच काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे तर, या नात्यातून जन्मलेल्या बालकाचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असेल.


सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या उलट निर्णय दिला. केरळ उच्च न्यायालयाने अशा मुलांसाठी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीचा अधिकार नाकारला होता. कारण बालकाच्या आईवडिलांनी लग्न केलेले नाही. 


परंतू सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, जरी बालकाच्या आई-वडिलांनी लग्न केलं नसेल. आणि DNA वरून हे सिद्ध होत असेल की, बालक त्याच पालकांचे आहे. तर त्याच्या वडिलांच्या संपत्तीत बालकाला अधिकार असेल. 2010 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती.