नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात रैनीमध्ये बांध फुटला आहे. बांध फुटल्याने नदीला पूर आला आहे. चमोली ते हरिद्वारपर्यंत यामुळे धोका वाढला आहे. प्रशासनाकडून रेस्क्यू टीम पाठवण्यात आली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कर्णप्रयागमध्ये अलकनंदा नदी किनाऱ्यावरील घरे रिकामी करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपर जिलाधिकारी टिहरी शिव चरण द्विवेदी यांनी माहिती दिली की, धौली नदीला पूराची सूचना मिळताच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने येथे अलर्ट जारी केला आहे. ऋषिकेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीतून बोटींग आणि राफ्टिंग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



चमोलीचे पोलीस अधीक्षक यशवंत सिंह चौहान यांनी माहिती दिली की, मोठ्या प्रमाणात नुकसानीची माहिती येत आहे. पण चित्र अजून स्पष्ट नाही. 


तपोवन बैराज पूरी उद्वस्थ झाली आहे. श्रीनगरमध्ये प्रशासनाने नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं आहे. नदी जवळ काम करणाऱ्यांना लोकांना देखील हटवण्यात आलं आहे.



स्टेट कंट्रोल रूमच्या माहितीनुसार गढवाल नदीची पाणी पातळी वाढली आहे. करंट लागल्याने अनेक लोकं बेपत्ता झाले आहेत.


मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांनी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सगळ्या जिल्ह्या्ंना अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदी किनाऱ्याजवळ न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.