पाटणा : बिहारच्या लोकप्रिय बाहुबली आणि RJD चे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचे आज निधन झाले आहे. एका हत्येप्रकरणी तो तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो आजारी पडल्यानंतर त्याला कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते असे जेल अधिकाऱ्यांनी सांगितले. शहाबुद्दीनच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावरही पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरही शहाबुद्दीनच्या मृत्यूची बातमी समोर येताच खळबळ उडाली. त्याचे समर्थक शहाबुद्दीनच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत, तर बरेच लोक मीम्स बनवून त्याला टार्गेट करत आहेत. आरजेडी प्रमुख तेजस्वी यादव यांनीही शहाबुद्दीनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्वीटरवरही शहाबुद्दीन ट्रेंड करत आहे. यावर लोक वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.



मोहम्मद शहाबुद्दीनला खूना प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शहाबुद्दीन आजारी असताना तुरूंगातील रुग्णालयात दाखवले असता त्याचा काही परिणाम झाला नाही, तेव्हा तुरूंगातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तत्काळ दीन दयाल मीध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


बाहुबली नेता म्हणून ओळखले जाणारा शहाबुद्दीनचे गुन्हेगारीच्या दुनियेत मोठे नाव आहे. शहाबुद्दीन केवळ वयाच्या 19 व्या वर्षी 1986 पासून गुन्हेगारीच्या जगात सामील झाला होता. त्यानंतर 24-25 वर्षे वयात सक्रिय राजकारणात त्याचे मोठे नावही बनले. शहाबुद्दीन एका खूना अंतर्गत तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्यानंतर शनिवारी दिल्लीतील रुग्णालयात कोरोनामुळे त्याचे निधन झाले आहे.