नवी दिल्ली: देवदर्शनावरून घरी परत जात असताना भाविकांना मृत्यूनं रस्त्यात गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वेदनादायक घटनेमद्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचाही समावेश आहे. केएमपी एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या गाडीत एकूण 11 लोक होते. जे देवदर्शन घेऊन घरी परतत होते. त्याच वेळी य़ा कुटुंबाचा भीषण अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाच्या बहादूरगडमध्ये ट्रकने कारला जोरदार धडक मारली. या धडकेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वेगवान ट्रकने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही काळासाठी रस्त्यावरील वाहातूक थांबवण्यात आली होती. मात्र काही वेळानंतर पूर्ववत कऱण्यात आली. 


या अपघातात गाडीचा ड्रायव्हर,  एक महिला आणि चिमुकला वाचला आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  फिरोजाबादच्या नागल अनूप गावातील लोक गोगा मेडी येथून दर्शन घेऊन घरी परतत होते. हे लोक भाड्याने घेतलेली आर्टिका कार घेऊन निघाले होते.


ड्रायव्हर, महिला गाडीतून बाहेर पडल्याने त्यांना जास्त दुखापत झाली नाही अशी माहिती मिळाली आहे. चिमुकल्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चिमुकल्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.