मुंबई : प्रवास हा सुखावणारा असला तरीही त्यातून शारीरिक थकवा हा भरपूर जाणवतो. लांबच्या प्रवासात गाडी चालवताना अनेकदा थकवा आणि झोपेमुळे डोळ्यांवर भार पडतो. अशावेळी अनेकदा चालकाला डुलकी लागते. 'झोपला तो संपला' त्याप्रमाणे एका क्षणात काहीही होऊ शकतं. 2017 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये ड्रायव्हरला गाडी चालवताना झोप लागल्याने दोन भीषण बस अपघात झाले. एक बस पर्यटकांना घेऊन जात होती तर दुसरी शाळा शिक्षक आणि मुलांना घेऊन जाणारी बस होती. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.


रस्ते अपघातांचा तरूणावर मोठा परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाखापट्टणममधील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी प्रदीप वर्माला या अपघाताच्या बातम्यांनी अस्वस्थ केलं. 22 वर्षीय प्रदीपला प्रश्न पडला की हे अपघात रोखण्यासाठी तंत्रज्ञान का नाही? त्यावेळी तो विशाखापट्टणम येथील गायत्री विद्या परिषद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत होता.


“बरेच संशोधन केल्यावर, त्याला जाणवले की, सध्या अपघात रोखण्यासाठी अनेक तंत्रे आहेत. पण गाडी चालवताना ड्रायव्हरला झोप लागण्यावर काय करायचे? यावर काही संशोधन नाही. राहुल त्याचे दोन मित्र रोहित के. आणि ज्ञान साई यांनी मिळून अशा तंत्रावर काम सुरू केले, जे अशा घटना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.



त्यांना अशी यंत्रणा तयार करायची होती जी ड्रायव्हर आणि रस्ता या दोन्हींवर लक्ष ठेवू शकेल. या तिघांनी हे उपकरण तयार करण्यासाठी तसेच महाविद्यालयातील सुविधा वापरण्यासाठी काही निधी जमा केला. त्यांनी यंत्रामध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे बसवले, जेणेकरून वाहनचालक तसेच रस्त्याचे निरीक्षण करता येईल. ड्रायव्हरच्या धिम्या गतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रोग्राम तयार करण्यात आला. 



बनवलं झोपेचं पॅटर्न ट्रेस करणारं उपकरण


प्रदीप सांगतात, “जर चालकाला झोप लागयला लागली. त्यांच्या पापणी लवण्याचा वेग कमी झाला, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की ड्रायव्हरला झोप येत आहे. अशा परिस्थितीत ड्रायव्हरला सावध करण्यासाठी डिव्हाइसमधून मोठा आवाज निघेल. ड्रायव्हरच्या मायक्रो स्लीप पॅटर्नचा शोध घेण्यासाठी देखील हे प्रोग्राम केलेले आहे. मायक्रो स्लीप पॅटर्न, म्हणजे कोणतही लक्ष न देता काही सेकंद झोपतो हे ठरवते.


ही प्रणाली पूर्णपणे इंटरनेटशी जोडलेली आहे. लोकेशन ट्रॅक करण्यासाठी त्यात जीपीएसही बसवण्यात आले आहे. गोळा केलेला डेटा क्लाउडवर अपलोड केला जातो आणि त्यानंतर ही सर्व माहिती अॅपद्वारे मिळवता येते. याशिवाय ड्रायव्हर सुरक्षितपणे गाडी चालवत आहे की नाही याचीही माहिती अॅपद्वारे मिळते.