अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या नेप्ती उपबाजार समितीमधिल शेतकनी अचानक रास्तारोको आंदोलन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक जास्त प्रमाणात झाली. 


रास्तारोको आंदोलन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे कांद्याचा लिलावाचा भाव ३४०० असताना तो १००० ते १२०० रुपयांनी कमी करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी कांदा लिलाव बंद करत रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन केले.


आंदोलन मागे 


अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे वाहतूकीची चांगलीच कोंडी झाली. अखेर शेतकर्यांच्या कांद्याला भाव वाढवून दिल्यानंतर शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले.