मुंबई : पोलिसांनी कितीही निर्बंध आणले तरी चोरांवर काही परिणाम होत नाही. अशीच एक बिहारमध्ये घडली आहे. पटनामधील मेहदीगंज परिसरात एका टीव्ही गोदामात 50 लाखाच्या टीव्हींची चोरी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तीन चोरांनी मिळून एक-एक करून एलइडी टीव्ही गोदामातून चोरले आहेत. अगदी काही दिवसांवर दिवाळी आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक सामानांची खरेदी केली जाते. यामुळे गोदामात जास्त प्रमाणात टीव्ही होत्या. 



चोरांनी सुरूवातीलाच गार्ड आणि ड्रायव्हरला बांधून ठेवलं त्यानंतर त्यांनी जवळपास 50 लाखांचे टीव्ही चोरले. चोरांनी जवळपास 250 टीव्ही, 35 हजार रुपये आणि चांदीचे शिक्के चोरले आहेत. हदीगंज दुकानातील ही घटना असून 20 ऑक्टोबर रोजी घडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत मात्र अद्याप चोरांचा तपास लागलेला नाही.