Rocket launcher attack : पंजाबमध्ये (Punjab) पुन्हा एकदा पोलीस ठाण्यावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरनतारनमधील सरहाली पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या सांझ सेंटरवर मध्यरात्री एकच्या सुमारास दहशतवाद्यांनी रॉकेट लाँचरने हल्ला केला. पोलीस ठाणे लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानची भूमिका असण्याची शंका


सरहाली पोलीस ठाणे हे अमृतसर-भटिंडा राष्ट्रीय महामार्गावर आहे. पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. सर्व तपास यंत्रणांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आलीय. पंजाब पोलीस या हल्ल्यामागे पाकिस्तानची काही भूमिका आहे का या अनुषंगाने चौकशी करत आहेत.


या हल्ल्यानंतर पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. या परिसरात दहशतवादी रिड्डाची दहशत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रिड्डाचा पाकिस्ताना मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अशातच सरहाली पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा मागचा हेतू काय होता याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.


कसा झाला हल्ला


अज्ञात हल्लेखोरांनी सरहाली पोलीस ठाण्यावर रॉकेट-लाँचर सारख्या शस्त्राने हल्ला केला. यानंतर पोलीस ठाण्यातील भिंत आणि दरवाजाचे नुकसान केले. या हल्ल्यानंतर कमी तीव्रतेचा स्फोट झाला. प्राथमिक तपासात हा आरपीजी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.



वर्षभरात दुसऱ्यांदा हल्ला


यापूर्वी मे महिन्यात पंजाबमधील मोहाली येथील पोलीस गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला होता. 


पाकिस्तान सीमेजवळील पोलीस ठाणे लक्ष्य


तरनतारन पोलीस ठाणे पाकिस्तान सीमेजवळ आहे. वाघा बॉर्डर ते तरणतारन हे अंतर फक्त 43.6 किलोमीटर आहे. तसेच अमृतसर ते तरनतारन हे अंतर फक्त 25 किमी आहे. तरनतारन येथील हल्ल्याचा पोलीस तपास करत आहेत.