Lalu Prasad Yadav Health update : राष्ट्रीय जनता दल (RJD) चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृतीबद्दल रोज नवे अपडेट समोर येत असतात. आता लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सुधारावी म्हणून मुलगी रोहिणी आचार्यने (Rohini Acharya) मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत लालू प्रसाद यादव किडनी ट्रांसप्लांट (Lalu Yadav Kidney Transplant) साठी सिंगापूरला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. (Lalu Prasad Yadav Health update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यादव 
सिंगापूरमध्ये राहणारी लालू प्रसाद यांची मुलही रोहिणीने वडिलांना किडनी देण्याचा (kidney transplant) निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी देखील लालू प्रसाद यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये असलेले लालू प्रसाद यादव सध्या दिल्लीमध्ये आहेत. (lalu yadav daughter)


लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा मोठा त्याग
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी रोहिणी आचार्य, लालू प्रसाद यादव (lalu yadav daughter rohini acharya) यांची दुसरी मुलगी आहे. लालू प्रसाद यादव 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान कधीही सिंगापूरसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला लेकीची किडनी घेण्यास लालू प्रसाद यादव यांनी नकार दिला होता. पण अखेर त्यांच्या मुलीने किडनी प्रत्यारोपणासाठी (Kidney Transplant) वडिलांना तयार केलं. 



लालू प्रसाद यादव यांचं किडनी प्रत्यारोपण
कुटुंबातील सदस्य किडनी दान करत असेल तर, ती शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होते. असं सांगण्यात येतं. लालू प्रसाद यादव सध्या सेंटर फॉर किडनी डिसीज या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. भाजप नेते आणि माजी राज्यसभा सदस्य आरके सिन्हा यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आला. एवढंच नाही तर  आरके सिन्हा यांनी लालू प्रसाद यादव यांनाही सेंटर फॉर किडनी डिसीज या रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला.