Rojgar Mela Sarkari Naukri: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या (Video Conferencing) माध्यमातून आज विविध संस्थांमध्ये भरती झालेल्या उमेदवारांशी (Candidate) बातचीत केली. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जवळपास 71,000 अपॉईंटमेंट लेटर देण्यात आले. पीएनबीमध्ये (PNB) नोकरी लागलेल्या पश्चिम बंगालमधल्या सुप्रभा बिस्वासने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. सुप्रभाचे वडिल मजूर आहेत, तर आई हाऊसवाईफ आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सरकारी नोकरी लागल्याने तिने पंतप्रधानांचे आभार मानले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या संभाषणाता पंतप्रधान मोदी यांनी डिजीटल व्यवहाराबाबत (Digital Transactions) विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. डिजिटल व्यवहाराबाबत तुमचे काय अनुभव आहेत? देशातील नागरिक डिजिटल व्यवहाराबाबत उत्साही आहेत का? असं पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना विचारलं. यावर विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यवहारामुळे दैनंदिन कामं खूपच सोपी आणि सुरळीत झाल्याची उत्तरं दिली. डिजिटल व्यवहारांमुळे आता बँकेत जाण्याची गरज नसते, सर्व कामं घरबसल्या होतात असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.


जम्मू-काश्मिरमध्ये राहणाऱ्या फैजल शौकत शाह याला श्रीनगर एनआईटीमध्ये नोकरी मिळाली. एनआईटीमध्ये नोकरी मिळाल्याने आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं शौकतने सांगितलं. रोजगार मेळाव्यात नियुक्ती पत्र मिळालं आणि आज मी देशाच्या पंतप्रधानांशी बोलतोय याचा मला खूप आनंद झाल्याचं शौकतने म्हटलं.


एका विद्यार्थ्याने सांगितलं, माझ्या यशामुळे माझे मित्र प्रेरित झाले असून त्यांनाही सरकार नोकरी मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. रोजगार मेळावा देशातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, तरुणांना त्यांच्या सशक्तीकरणासाठी हा मेळावा उपयोगी ठरेल असंही या विद्यार्थ्यांने म्हटलं. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 लाख तरुणांना नोकरी देण्याचं अभियान सुरु केलं आहे. विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला होता. पहिल्या टप्प्यात 75 हजार तरुणांना नोकरी देण्यात आल्या. जगभरात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरु असून भारतात ही स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरात, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातल्या रोजगार मेळाव्यातील उमेदवारांना संबोधित केलं.