Romance Viral Video : सोशल मीडिया सेकंद सेकंदाला अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ हे नेटकऱ्यांना आकर्षित करतात. या वर्षाची सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर धावत्या बाईक, स्कूट अगदी कारच्या रुफ टॉपवर कपल रोमान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले. कधी जयपूर तर कधी लखनऊमध्ये दिवसा तर कधी रात्री...अगदी होळीच्या दिवशीदेखील रस्त्यावरुन धावत्या गाडीवर कपलचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सगळ्यांना हैराण करत होता. या कपलमुळे पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. 


हे अती झालं आता!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुण तरुणीचा रोमान्स करताचे व्हिडीओ पाहिले आहे. पण आता दोन तरुण रस्त्यावर  खुलेआम चुंबन करताना दिसले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्या तरुणाने गाडी चालवताना हेल्मेटही घातलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी आणि धावत्या गाडीत अशाप्रकारे अश्लील चाळे करणे हा गुन्हा मानला जातो. पण अशा तरुणांना कसं वेठीस आणायचं हेच कळत नाही. या तरुणांना पोलिसांचाही धाक राहिलेला नाही का? (Romance boys kissing on moving scooty video viral on social media trending now)



हा व्हिडीओ कुठला आहे याची पुष्टी झालेली नाही मात्र त्या स्कूटवरील नंबर प्लेटवर मुरागाबादचा आहे. या तरुणांवर पोलीस काय कारवाई करता हे पाहवं लागणार आहे.  काही दिवसांपूर्वी लखनऊमधील एका कपलचा रोमान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.