शून्यातून उद्योगनिर्मिती ते कोटींची उलाढाल, `ही` उद्योजिका ठरली देशातील श्रीमंत महिला
त्यांची कन्या रोशनी नाडर या कंपनीचा कारभार सांभाळत असून आता त्या या कंपनीच्या चेअरपर्सन आहेत.
Indian Richest Women: HCL technologies च्या चेअरपर्सन रोशनी नाडर यांनी देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक होण्याचे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी रोशनी यांचे उत्पन्न 84 कोटी एवढे नोंदवले असून त्यांच्या उत्पन्नात 54 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांचे एकूण उत्पन्न ( net worth) 84,330 कोटी एवढे नोंदवले गेले आहे. HCL technologies या कंपनीची सुरूवात उद्योपती शिव नाडर यांनी केली. त्यांची कन्या रोशनी नाडर या कंपनीचा कारभार सांभाळत असून आता त्या या कंपनीच्या चेअरपर्सन आहेत.
त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर 'नायका' या ब्रॅण्डच्या चेअरपर्सन फाल्गूनी नायर यांनी स्थान पटकावले असून त्यांचे उत्पन्न 57 कोटी एवढे नोंदवले गेले आहे. त्यांचे एकूण उत्पन्न हे 57, 520 कोटी एवढे आहे. Kotak Private Banking-Hurun list मधून बुधवारी देशातील 100 सर्वात श्रीमंत महिला उद्योजिकांची यादी प्रसिद्ध झाली आहे.
Biocon च्या किरन मजूमदार-शो यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला असून त्यांच्या उत्पन्नात मात्र 21 टक्क्यांची घट झाली आहे. त्यांचे उत्पन्न हे 29, 030 कोटी रूपये एवढे आहे.
100 महिलांच्या यादीत फक्त भारतीय महिलांचा समावेश आहे. ज्यांचा जन्म भारतात झाला असून त्या भारतातच वाढल्या आहेत आणि त्यांनी आपले स्वतंत्र व्यवसाय प्रस्थापित केले असून त्यांचा बिझनेझ हा self-made (स्वयंनिर्मित) आहे. या 100 महिला उद्योजकांची संपुर्ण संपत्ती ही एका वर्षात 53 टक्क्यांनी वाढून 2021 मध्ये 4.16 लाख कोटी रुपये झाली आहे, जी 2020 मध्ये 2.72 लाख कोटी रुपये इतकी होती आणि ज्यांचा भारताच्या GDP मध्ये 2 टक्के इतका वाटा राहिला आहे.
कोण आहेत रोशनी नाडर?
रोशनी नाडर या उद्योपती शिव नाडर यांच्या कन्या आहेत. त्या HCL technologies च्या चेअरपर्सन असून shiv nadar foundation च्या ट्रस्टी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातील ग्रामीण मुलांच्या शिक्षणाचेही काम पाहिले आहे. त्यांचे नाव हे फॉर्ब्सच्या यादीत दोनदा झळकले आहे. त्यांनी Kellogg School of Management आपले एमबीएचे शिक्षण पुर्ण केले आहे. 2021 forbes च्या यादीत जगातील सर्वात ताकदवान महिलांमध्ये त्या top 100 मध्ये आल्या होत्या.
टॉप 10 महिला उद्योजकांमध्ये आहेत यांची नावे -
रोशनी नादर मल्होत्रा (HCL) - 84, 330 कोटी
2 फाल्गुनी नायर (Naykaa) - 57,520 कोटी
3 किरण मुझुमदार शॉ (Biocon) - 29,030 कोटी
4 निलिमा मोतापार्टी (Divi's Laboratories) - 28,180 कोटी
5 राधा वेंबु (zoho) - 26, 260 कोटी
6 लीना गांधी तिवारी (USV) - 24,280 कोटी
7 अनु आगा आणि मेहर पुदुमजी (Thermax) - 14,530 कोटी
8 नेहा नारखेडे (Confluent) - 13,380 कोटी
9 वंदना लाल ( Dr. Lal Pathlabs) - 6,810 कोटी
10 रेणू मुंजाल (Hero fincorp) - 6,620 कोटी