अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचला असताना, आता नवा वाद सुरु झाला आहे. 


सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बुधवारी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिर ट्रस्टच्या नियमानुसार, बिगर हिंदूंना सोमनाथाचं दर्शन घ्यायचं झाल्यास आधी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. राहुल गांधींनी रजिस्टरमध्ये स्वतःच्या धर्माची पारशी, अशी नोंद केली आणि पूर्वपरवानगी घेऊन सोमनाथाचं दर्शन घेतलं. 


 राहुल गांधी बिगर हिंदू ?


राहुल गांधींसोबत अहमद पटेल यांनीही सोमनाथाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी बिगर हिंदू असल्याचा मुद्दा आता गुजरात निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.


दरम्यान, यातील एक नोंदवही बिगर हिंदूसाठी तर दुसरी वही हिंदूंसाठी ठेवण्यात आली होती. राहुल यांच्या आधी पटेल यांनी बिगर हिंदूंच्या नोंदवहीत स्वाक्षरी केली. राहुल त्यांच्यामागेच उभे होते. त्यांनीही त्याच वहीत स्वाक्षरी केली व ते बाहेर पडले.



हे नकळत घडल्याचे बोलले जातेय


राहुल यांच्याकडून हे नकळत घडल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनी स्वाक्षरी केलेल्या नोंदवहीतील पानाचा फोटो सोशल साईटवर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.